Fy BA कथा आणि भाषिक कौशल्यविकास Nots


Fy BA कथा आणि भाषिक कौशल्यविकास  Nots


 मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास आणि एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास

Fy BA Nots कथा Notes 

प्र. 1 लाखालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.  

1) कथेचे स्वरूप थोडक्यात सांगा

उत्तर : कथेचे स्वरूप आपल्याला पुढीलप्रमाणे थोडक्यात सांगता येईल.

 मराठी कथा  गोष्ट, कहाणी, कथा, लघुकथा, नवकथा, साठोत्तरी कथा अशा क्रमाने विकसित होत  गेलेली दिसून येते. 

कथेचे अनुभवविश्व समृद्ध आहे. कथेला कोणताही विषय वर्ज्य नसतो. 

अंतर्मन-बाह्यविश्व, व्यक्ती-समाज, निसर्ग-महानगर असे अनेकविध विषय कथेने आविष्कृत 

केले आहेत.

थोडक्यात भाषा, शैली, तंत्र, ज्ञानव्यवहार यांना मुरवत कथा या साहित्यप्रकाराचा 

विकास झाला आहे. त्यामुळे कथेचे स्वरूप हे व्यामिश्र असलेले दिसून येते  

प्र. 2 रा. कथेचे घटक थोडक्यात सांगा.

उत्तर : कथेचे घटक आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील.


1)कथानक : कथानक हा कथेचा मुख्य घटक आहे. कथेमध्ये कल्पित वास्तव  विश्व निर्माण होत असते. हे विश्व विशिष्ट पद्धतीने कथन केले जाते. गोष्टीमध्ये

घटना-प्रसंग हे कालानुक्रमे सांगितलेले असतात, तर कथेतील घटना-प्रसंग हे  कालानुक्रमाबरोबर कार्यकारणभावाने परस्परांशी गुंफलेले असतात म्हणून कथा  कथानक होय.

2) व्यक्तिचित्रण : व्यक्तिचित्रण हाही कथेचा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्यक्षातील व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा कथानकात असते, या प्रतिमेला पात्र असे म्हणतात. ही पात्रे प्रत्यक्षातील माणसाप्रमाणे असतात. कथानकात विशिष्ट कृती करण्यासाठी 

पात्रयोजना केली जाते. निवेदन आणि वर्णन यातून कथेमध्ये व्यक्तिचित्रण केले  जाते. अशा व्यक्तिचित्रणातून कथेमध्ये पात्र जिवंत करणे, हे महत्त्वाचे ठरत असते.


3) वातावरण : वातावरण हा कथेच्या संरचनेचा एक घटक आहे. कथानक हे    स्थलकालाच्या अवकाशामध्ये घडत असते. हे अवकाश वास्तव-कल्पित असते. या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर पात्र, घटना-प्रसंग घडत जातात. निवेदक हा 

कथेमध्येनिवेदन आणि वर्णनातून स्थलकालाचा अवकाश निर्माण करीत असतो.  

त्यामुळे कथेमध्ये, फार फार वर्षापूर्वीचा काळ होता. एक होता...’ अशा निवेदनातून   भूतकाळाचे वातावरण तयार होऊ लागते. त्यामुळे वातावरण हा घटक कथेच्या  हत्त्वाचा असतो


4) लेखकाचा दृष्टीकोन  

.कथा निर्मितीमध्ये लेखकाचा दृष्टीकोन या घटकाला महत्त्व असते. कथेतील घटनांमागे पात्रांचे विविध प्रकारचे हेतू दडलेले असतात. या घटनांमागे लेखकाची जीवनसरणी व मूल्यप्रणाली उभी असते. कथेतील शब्दार्थमय कहाणी निवेदक पात्रांकडून सांगितली जाते. या निवेदक पात्रांची एक जीवनदृष्टी असते. या जीवनदृष्टी व कथा हेतूमागे लेखकाची व्यापक भूमिका 

असते. लेखक हा कलावंत असल्यामुळे जीवनात घडणाऱ्या घटना, प्रसंगांचा त्याच्या मनावर खोल परिणाम होतो. त्यामुळे त्याच्या मनात काही प्रतिक्रिया तयार होतात. या प्रतिक्रियांना नैतिकतेचा आधार असतो. यातून लेखकाचा विशिष्ट दृष्टीकोन दिसून येतो.


5) निवेदन : कथन, निवेदनामागे लेखकाचा कलाहेतू, मूल्यभाव असतो. निवेदकाच्या निवेदनातून कथानक साकार होत असतो. निवेदक हा विशिष्ट पद्धतीने घटनाप्रसंगाचे निवेदन करीत असतो. कथेमध्येप्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी निवेदक असतो. हा निवेदक वाचकापुढे कथानक उलगडत नेत असतो.

6) भाषा : भाषा हा कथेचा महत्त्वाचा घटक आहे. कथेची संहिता भाषेतून उलगडत जाते. कथेमध्ये भाषा दोन प्रकारचे काम करते. लेखकाच्या मनातील आशय वाचकापर्यंत पोहोचविते. तसेच ती कथेमध्ये सौंदर्य निर्माण करीत असते. म्हणून कथेतील निवेदन, वर्णन, संवाद यासाठी भाषेची अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि प्रवाहीयोजना केली जाते.

थोडक्यात पात्रे, घटना-प्रसंग, वातावरण-निर्मिती, निवेदन, भाषाशैली आदी घटकांच्या एकात्म संरचनेतून कथा निर्माण होत असते. 



खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

प्र. 1. कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे विशेष लिहा?

उत्तर : कथा म्हणजे काय ते आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येईल. 

1) ना. सी. फडके : कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्यावेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटविणारी हकिकत म्हणजे लघुकथा होय.

2) इंदुमती शेवडे : एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा.

कथेचे विशेष :


1) कथा सामान्यतः व्यक्तीच्या, समाजाच्या, जीवनातील एखाद्या टप्प्याचे अवस्थेचे, विशिष्ट जीवनानुभवाचे चित्रण करताना दिसते. ती एखाद्या स्थितीवर केंद्रित झालेली असते. ती एखाद्या प्रसंगातून जन्म घेत असते. प्रत्यक्ष व्याप्ती नसली, तरी कथेतील जीवनचित्रणाला व्यापक संदर्भ असू शकतो.

2) कथेच्या विषयाला स्वरूपावर बंधन नसले तरी आकारामुळे बंधन पडते. 

3) कथेतील अनुभव हा एकात्म आणि एकविध असतो. तिच्यात एकच आशयकेंद्रही असते. त्यामुळे या एककेंद्रीपणामुळे कथेत एकता अपरिहार्यपणे येत असते.

4) कथेला अवकाशाची मर्यादा असल्याने आशयाच्या व्याप्तीला व त्याच्या परिणामाला ही मर्यादा पडते. जीवनाचे समग्र दर्शन कथेतून घडत नाही. जीवनाच्या काही भागाचेच कथा व्याप्ती मर्यादेमुळे दर्शन घडविते.

5) मराठी कथेने आपले रूप सतत बदलले आहे. सभोवतालच्या वातावरणात झालेले परिवर्तन झेलले आहे.

6) कथानकात लेखकाने घेतलेला, काल्पनिक, कुणीतरी सांगितलेला अनुभवकथानकाच्या रूपाने वाचकांपर्यंत कथेच्या माध्यमातून पोहचतो.

7) कथेतील अनुभव हा एकविध, एकपिंडी व एककेंद्री असतो. कथेची रचना एकात्मअसून परिणाम ही एकात्म होतो.

8) कथेत विस्तारापेक्षा भावनांची तीव्रता आणि सूचकता अधिक महत्त्वाची असते.

9) संस्कारिकत्व हे कथेचे व्यवच्छेदक लक्षण असते.अशा प्रकारे आपणाला कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे विशेष सांगता येतील.


प्र. 2 रा. 1990 नंतरच्या कथेविषयी सविस्तर लिहा?

उत्तर : 1990 नंतर खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाने भारतीय समाज जीवनात बरेच बदल झाले. माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट, वस्तूंचे-सेवांचे, जीवनपद्धतींचे, 

सांस्कृतिक जीवन संचिताचे बाजारीकरण होऊ लागले. सामान्य माणसाची जीवनशैलबदलली. त्याच्या वैचारिक निष्ठा बोथट झाल्या. व्यक्तिगत सुख, चंगळवाद याला अधिक महत्त्व आले. अतिरेकी स्वातंत्र्य, मूल्यांची घसरण, ढासळलेली कटुंबव यवस्था, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते प्राबल्य, आधुनिक भांडवलशाही, नवतंत्रज्ञानाचा युवा वर्गावरील परिणाम, व्यक्तिकेंद्रितता यामुळे समाजजीवन प्रभावित झाले.

1990 नंतर दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी, विज्ञान इ. प्रवाहांतील कथालेखन मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येते. 1990 नंतर बदललेले समाज जीवन, रुढी, परंपरा, संस्कृती, विचार, नैतिकमूल्ये यांचे चित्रण अतिशय चिंतनशील, गांभीर्यपूर्ण रेखाटलेले दिसून येते.ग्रामीण कथेमध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, जागतिकीकरणामुळे बदललेली 

्बजार व्यवस्था, शेतीमालाची होणारी हेळसांड, राजकीय पिळवणूक, कौटुंबिक कलह, वास्तव जगण्यातील संघर्षचित्रित झालेला दिसून येतो. अलीकडील सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, सचिन वसंत पाटील, किरण गुरव, प्रभाकर हरकळ आदींच्या कथांमधून हे विषय ठळकपणे पुढे येताना दिसतात.

दलित कथेमधून मध्यम वर्गाची होणारी ससेहोलपट, मुक्त अर्थव्यवस्था, चंगळवाद, महानगरीय संवेदना, व्यवहारवादी व भौतिकवादी नव मानसिकता, मूलभूत हक्क व कायद्याची जाणीव, बुद्ध संस्कृती, खेड्यातील जात वास्तव, माणसाचे हरवलेपण आदींचे चित्रण गांभीर्यपूर्ण

पद्धतीने रेखाटलेले दिसून येते. जयंत पवार, प्रकाश खरात, जयराज खुणे, दीपध्वज कोसादे, गौतमीपुत्र कांबळे, प्रज्ञा दया पवार आदि लेखक, लेखिका ही कथा समृद्ध करीत आहेत.

स्त्रीप्रश्न, स्त्रीशोषणावर आधारलेली पुरुषप्रधान संरचना, स्त्री-स्वातंत्र्य, स्त्रीची स्वतंत्र

ओळख या सर्व विषयांना केंद्रवर्ती ठेवून स्त्रियांचे कथालेखनही 1990 नंतर मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येते. गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, मेघना पेठे, उर्मिला पवार आदि

स्त्रियांच्या कथालेखनातून स्त्रीवादाची जाणीव, जीवनविषयक मूलभूत प्रश्न, नातेसंबंधातील गुंतागुंत, मानसिक ताण-तणाव, स्त्री-शक्तीची जाणीव इ. विषयांतून मराठी कथेचा आशय आणि आविष्कार समृद्ध होत आहे.

आदिवासी कथेतून अज्ञान, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, सावकारशाही, शोषण, जातपंचायत, बाजारीपण इ. विषयांना केंद्रवर्ती ठेवून कथालेखन समोर येत आहे. यामध्ये पंढरीनाथ तामोरे, जयवंत वैती, उषाकिरण आत्राम, माधव सरकंडे, बाबारा ु व मडावी आदि लेखकांनी हे कथाविश्व उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.विज्ञान कथेचा परीघही दिवसेंदिवस विस्तारत चाललेला दिसून येतो. यामध्येवैज्ञानिक 

दृष्टीकोन, विज्ञानातील संकल्पना, शास्त्रज्ञांचे योगदान, विज्ञान आणि समाज, विज्ञान प्रसाराची 

चलवल  इ. विविध विषयांना केंद्रवर्ती ठेवून लेखन केलेले दिसून येते. अलीकडे डॉ. संजय ढोले, निरंजन घाटे, अरुण मांडे, सुबोध जावडेकर यांचे लेखनही मोठ्या प्रमाणात येताना दिसून येते.अशा प्रकारे आपल्याला 1990 नंतरच्या कथेची ओळख करून घेता येईल.


महत्त्वाचे शब्द

निवेदन = एकानंतर एक घटना सांगत जाणे याला निवेदन म्हणायचे. घटनांची साखळी कालक्रमानुसार असते ती त्याच क्रमाने सांगणे म्हणजे निवेदन.


सर्जनशीलता = निर्मितीशीलता, इंग्रजीत याला Creativity असे म्हणतात.




थोडे नवीन जरा जुने