FY BA मराठी कथेची वाटचाल लिहा?

 

दीर्घ प्रश्न 

मराठी कथेची वाटचाल लिहा?

मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास आणि एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास

Fy BA Nots कथा Notes 

मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास आणि एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास  Fy BA Nots कथा Notes

मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास आणि एकांकिका आणि भाषिक कौशल्यविकास pat 1 read more 


कथेची वाटचालील पुढील प्रमाणे सांगता येईल 

आधुनिक साहित्यप्रकार म्हणून मराठी कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती एकोणिसाच्या शतकाच्या उत्तरार्धात, मुद्रणकलेच्या उदयानंतर. या काळात नियतकालिकांचा झालेला उदय कथेच्या निर्मितीला व वाढीला प्रेरक ठरलेला दिसून येतो. अव्वल इंग्रजी कालखंडातील सुरुवातीच्या काळात मराठी ज्ञानप्रसारक सारख्या नियतकालिकांतून भाषांतरित, रुपांतरित व स्वतंत्र असे मुख्यतः बोधपर तसेच रम्यद्भूत स्वरुपाचे कथासाहित्यप्रसिद्ध होत होते. सामान्यतः धार्मिक शिक्षण, नीतिबोध व स्वप्नरंजन यांचे साधन म्हणूनच तेव्हा कथेचा वापर झाला. 

आधुनिक मराठी कथेची खऱ्या अर्थाने सुरू झाली, ती ह.ना. आपटे यांच्या स्फुट गोष्टींनी. त्यांच्या करमणूक पत्रातून (1890-1927) प्रसिद्ध झालेल्या ‘आजकालच्या गोष्टीतून’ त्यांनी समकालीन मराठी जीवन संस्कृतीचे वास्तवदर्शी चित्रण केलेले दिसून येते.  महाराष्ट्रातील प्रबोधन युगाच्या या काळात हरिभाऊंच्या कथालेखनामागील मुख्य प्रेरणा बोधवादाची होती.  कथा हे जीवनदर्शनाचे माध्यम आहे. ही जाणीव कथेतून प्रथमतः त्यावेळी दिसून आली. 

यानंतरच्या मनोरंजन कालखंडातील (1990-26) प्रातिनिधिक कथा वि.सी. गुर्जर यांची म्हणता येईल. त्यांनी मोठ्या प्रमाणावर बंगाली व इंग्रजी कथांचे अनुवाद व रुपांतरे केलेली दिसून येतात. कल्पनारम्य प्रणयभावनेचे चित्रण, उत्कंठावर्धक रहस्यपूर्ण कथानके हे त्यांच्या कथेचे विशेष सांगता येतील.   

कथेच्या जीवनदर्शनाच्या विशिष्ट क्षमतेची, तिच्या वेगळेपणाची कलात्मक ओळख करून देणारी कथा प्रथमतः मराठीला दिली ती दिवाकर कृष्णांनी. त्यांनी मराठी वाचनाची अपेक्षा व अनुभवाभिमुख केले. त्यानंतरच्या ना. सी. फडके व वि. स. खांडेकर या मराठी साहित्यावर प्रभाव गाजवणाऱ्या साहित्यिकांनी पुढे फारसी चालवलेली दिसत नाही. फडके यांनी कलावादाचा पुरस्कार केला तर आपल्या समस्याचित्रणात्मक कथेतून सामाजिक ध्येयवाद, आदर्शवाद यांचे संस्कार करण्याची खांडेकरांची जीवनवादी भूमिका दिसून येते.  कथा लोकप्रिय करण्याचे, तिचा विस्तार करण्याचे श्रेय फडके-खांडेकरांना देण्यात येते. पुढे रत्नाकर (1926-33), यशन्वत (प्रारंभ: १९२८) यांसारख्या मासिकांनी या काळात कथेची जोपासना केली 

कथेचे लघुकथा हे नाव याच काळात रुढ झाले आणि तिच्या तत्त्वचर्चेलाही प्रारंभ झाला. किंबहुना एकूणच साहित्याच्या विविध प्रकारांच्या वेगळेपणाचे भान तेव्हा नव्याने निर्माण झालेले दिसून येते. ना. सी. फडके यांचा प्रतिभासाधन हा ग्रंथ याचेच द्योतक आहे. पुढे ‘लघुकथा लेखन : मंत्र आणि तंत्र’ या कथेवरील स्वतंत्र ग्रंथात फडके यांनी कथेची स्वरूप वैशिष्ट्येव तिचा तंत्रविचार यांची मांडणी केली. त्यांच्या या लेखनामुळे कथेच्या तत्त्वचर्चेला चालना मिळाली, तसेच कथेचे एक स्वतंत्र प्रकारविशिष्ट असे तंत्र असते याचे भान निर्माण झालेले दिसून येते. 

1935 च्या सुमारास मराठी कथाक्षेत्रातीलच नव्हे, तर एकूणच साहित्य क्षेत्रातील निर्मिती ही साचेबंदपणा, आवर्तपरता, स्थितिशीलता यांनी ग्रासलेली दिसते

कुंठिततेला छेद देणारी कलादृष्टी मधल्या काळात कुसुमावती देशपांडे, वामन चोरघडे, यांच्या कथांतून व्यक्त झालेली दिसते. कथानकवादी कथा घटकासंबंधीची एकूण कथा रूपसंबंधाची खुली संकल्पना, मनोदर्शनातील नवी परिमाणे, कथेच्या व्यंजक गुणवत्तेचे नेमके भान इ. विशेषांमुळे त्यांनी कथेला अधिक प्रगल्भ रूप दिले.

यानंतर मराठी कथाविश्वात 1940 नंतरच्या दशकात गंगाधर गाडगीळ प्रभृतींनी मूलगामी परिवर्तन घडवून आणले. त्यांनी मराठी नवकथा घडवली असे म्हणावे लागते. 

नवकथेच्या जडणघडणीत गाडगीळांच्या जोडीने अरविंद गोखले, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर यांचा प्राधान्याने सहभाग होता. शांताराम, सदानंद रेगे, यांच्या कथांतूनही नव्यावाङ्मयीन जाणिवा व्यक्त झालेल्या दिसतात. 

मात्र तत्कालीन नव्या युगधर्माचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व गाडगीळांनीच केले.नवकथेने कथेच्या प्रस्थापित व1945 ते 1960 हा नवकथेचा, तिच्या प्रभावाचा कालखंड म्हणता येईल. 

नवकथेने जो नवा मूल्यविचार रुजवला, त्यातून पुढे मराठी कथा अनेक अंगांनी समृद्ध होण्याच्याशक्यता निर्माण झाल्या. कथेच्या कलात्मक सामर्थ्याच्या, संपन्नतेच्या शक्यता प्रत्यक्षात आणण्याचा असा एक प्रयत्न जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये दिसतो. अनुभवाची चिंतनात्म प्रकृती, जीवनदर्शनातील व्यामिश्रता यांसाठी त्यांना दीर्घकथा विशेष अनुरुप वाटली. दीर्घकथा या प्रकारात इतरही महत्त्वाच्या कथाकारांनी या पुढच्या काळात लेखन केलेले दिसते. (उदा. दिलीप चित्रे, कमल देसाई, चि. त्र्यं. खानोलकर इ.) 

1960 नंतरच्या काळात महाराष्ट्र राज्याची स्थापना, शिक्षणाचा सर्वदूर व सर्व स्तरांतील प्रसार, नवीन वाचकवर्गव लेखकवर्ग यांचा उदय दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी, आदिवासी साहित्य अशा सामाजिक-साहित्यिक चळवळींनी जोर धरलेला दिसून येतो पुढे या सर्व साहित्य प्रवाहांमधून अनेक लेखकांनी विविध वाङ्मय प्रकारात लेखन करायला सुरुवात केलेली दिसून येते. या प्रवाहातील लेखकांनी कथेचे दालन समृद्ध केलेले दिसून 

येते. याच टप्प्यावर विज्ञानकथेनेही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले दिसून येते. या 

सर्व पार्श्वभूमीवर लोकप्रिय वळणाच्या कथासाहित्याची निर्मिती या निमित्ताने होत राहिली.

1890 नंतर उदारीकरण पर्वाला नव्याने सुरुवात झालेली दिसून येते. त्यातूनच खासगीकरण आणि जागतिकीकरण दिसून येते. माहिती-तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार,बाजारीकरण, माणसाची बदलती जीवनशैली,व्यक्तिकेंद्री स्वभाव, चंगळवाद या गोष्टींना अधिक महत्त्व आलेले दिसून येते.अतिरेकी स्वातंत्र्य, मूल्यांची घसरण, ढासळलेली कुटुंबव्यवस्था, आधुनिक भांडवलशाही, नवतंत्रज्ञानाचा युवा वर्गावरील परिणाम यामुळे समाज जीवन पूर्णतः ढवळून निघालेले दिसून येते. एका अर्थाने जीवन जगण्याची ही नवी शैली विकसित होताना दिसत आहे.

एकूणच 1990 नंतरची कथा समकालीन गतिमान, दुभंगलेली व व्यामिश्र जीवन, सर्वव्यापी राजकारण, शोषणाच्या नव्या रीती, बदलते वर्तमान, शेतकरी, बेरोजगारी, रुढी, परंपरा, संस्कृती यांचे बदलते संदर्भ, नातेसंबंध, महानगरातील बदलती जीवनशैली, बदलते ताण-तणाव, अंधश्रद्धा, कामगार, कष्टकरी आणि मजूर यांचे प्रश्न, बदलते अर्थकारण, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतीमालाची होणारी हेळसांड, माणूसपणाचा शोध इ. असे अनेक विषय कवेत घेऊन समकालीन मराठी कथा आपल्याला समृद्ध होताना दिसत आहे. अशा प्रकारे आपल्याला  मराठी कथेची वाटचाल  सांगता येईल 

   Fy BA कथा आणि भाषिक कौशल्यविकास Nots 

थोडे नवीन जरा जुने